ENFANT INDIA ENGLISH SCHOOL
FIRST UNIT TEST
STD 9th
SUB. MARATHI
MARKS-20
पुढील परिच्छेदाचाआधारे केलेल्या सूचनांनुसार कृती करा
प्रश्न १
अ)आकलन कृती २ गुण
आकृती बंध पूर्ण करा.
i)मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव करणारे .
[. ] [ ]
ii) रेल्वेचा पहिला छोटा फाटा
________ ते _________
२ ) उत्तरेलिहा.१ गुण
i) आगीन गाडी निघणार त्या मुहूर्ताचा दिवस. ___________
ii) कलियुगातला हा विग्रेंजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले. ___________
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला . मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीर भाई डेव्हिड ससून वगैरे अनेक , नामांकित नगर शेटजीचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच . सन १८५३ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्ताच्या तयार झाला . लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार , ही कल्पनाच लोकांना अचंब्याची वाटली.
अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला . दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाने लावून १० मोठे खोलीवजा डबे शुंगार लेले. इंजिनावर अंग्रे्जांचे मोठे निशाण फडकत आहे.डब्यात गादीच्या
खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी , जीजी भाई , नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगर शेट जामानिमा करून बसलेले. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूSक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबईतील ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रे्जी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
प्रश्न ३) i) अचूक शब्द लिहा. 1गुण
१) पेनिनशुला, पेनीनशुला,
पेनिनशूला,पेनिशूला
२) झुकझूक, झुकझूख, झुकझुक ,झूकझूक
प्रश्न ३ ii) वचन बदला १ गुण
i) डबा. ii) निशाण
प्रश्न ४) स्वमत २ गुण
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक. विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
प्रश्न १ ब) पुढील परिच्छेदाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा
कृती१ ( आकलन कृती)
चौकटी पूर्ण करा १ गुण
i) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचे प्रतीक............
ii) झेंड्याचा केशरी रंग गुणांचे प्रतीक
.......
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोक चक्र काय सांगते ? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू , सत्यमय राहू , असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की, गतीमान राहा. केशरी रंग हा त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारी पणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया
कृती २ आकलन कृती १ गुण
आकृतीबंध पूर्ण करा
१) या कृतीने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा
__________ व __________
कृती ३ व्याकरण कृती २ गुण
१) विरुद्धार्थी शब्द लिहा
i) पांढरा ii) सत्य.
२) वचन बदला
i) झेंडा. ii) चक्र
कृती ४) स्वमत. २ गुण
झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत लिहा.
पद्य - विभाग
प्रश्न २ खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा २गुण
i) . भुकेलिया बाळ
|. |
अती करतो वाट पाहतो
________. __________
ii) सह संबंध लिहा.
लेकी: आसावली ::. उरि: ________
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली
पाहतासे वाटुली पंढरीची ||
भुकेलिवा बाळ अति शोक करी
वाट पाहे उरि माऊलीची ||
तुका म्हणे मज लागलीसे भूक
धावुनि श्रीमुख दावी देवा ||
२) खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा १ गुण
संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?
३) (अभिव्यक्ति)३ गुण
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत का स्पष्ट करा
व्याकरण विभाग
प्रश्न ३ ) खालील.उदाहरणातील. उपमेय , उपमान , समान धर्म साधमर्य वाचक शब्द. लिहा.
२ गुण
1) महाराणा प्रताप वाघा सारखे शूर होते.
२) लहानगी वसुधा जणू गोड परीच!