Recent

Sunday, August 8, 2021

Std-8 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT INDIA ENGLISH  SCHOOL 
             FIRST UNIT  TEST
             STD  8th
             SUB  .MARATHI
             MARKS-10

प्रश्न १  खालील . उताऱ्याच्या  आधारे दिलेल्या  सूचनांनुसार  कृती करा
 १) आकृती पूर्ण करा.१ गुण
i)    आठवडी बाजाराचा परिसर 
l)_______            II) __________ 
 ii) चौकटी पूर्ण करा.१ गुण
१) आयते कपडे  विकणारा . [.      ]
२) या झाडाची दाट सावली पडायची
                      [.      ]
  आमच्या  गावात  आठवडे बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला  यायचा. सगळा  डोंगर भाग . फक्त पायवाटा. तो आपला माल  घोड्यावर  लादून  आणायाचा. नांद्रुकीच्या  झाडाची दाट सावली पडायची.तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा .  आम्हाला  घोड्याची लीद दिसली . लीद  म्हणजे  घोड्याच  शेण . त्यात  बरेच  धागे धागे दिसत होते.  हे धागे माती धरून ठेवतील , असा विचार करून   आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तीला बिलकुल तडे जात नव्हते . केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही.
२) कारण लिहा  १ गुण
i) आता  लेखकांच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते.
३) उताऱ्यात आलेले समानार्थी शब्द लिहा.  १ गुण
i ) खेडे.   _________
ii) सर्व.    _________
 ४) एकवचन  व अनेकवचन     वर्गीकरण  करा.१ गुण
( कपडे, आठवडे, सावली, घोडा, मूर्ती, धडा,  धागे, )

                   पद्य विभाग
खालील पद्य पंक्तीचा  अर्थ  समजून घेऊन  त्यावर विचारलेल्या कृती पूर्ण करा
कृती१ आकलन  कृती 
१) खालील कृती पूर्ण करा १ गुण
i) नव्या युगाच्या  नभात पसरलेले  _____________
ii) कला- गुणांच्या ‌ क्षितिजावरती.


हे ज्ञानाचे तेज  पसरले  
नव्या युगाच्या  नभात
कला   गुणांच्या  क्षितिजावरती 
ही  प्रतिभेची  प्रभात

भव्य पंटागण, बाग ‌मनोहर 
फुला - पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे 
मनामनांतून इथे निरंतर


गुरुजंनाची  अमूल्य शिकवण  या
स्पर्धेच्या युगात
 कला गुणांच्या क्षितिजावरती ही
प्रतिभेची प्रभात

पाया भरणी  अस्तित्वाची 
प्रयोगशाळा  व्यक्तित्वाची
तन सुदृढ , मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या  तत्वाची 
विचार  धारा तीच  वाहते
 नसानसात , रंग रंगात  
कलगुंणाच्या क्षितिजा वरती 
ही प्रतिभेची प्रभात

 २)खालील   प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.२ गुण
i)  ‌ सुंदर  जग कोणाचे आहे ?
ii) पसरणारा सुवास कशाचा आहे ?

३)स्वमत  २  गुण
    तुम्हांला  कळलेली  कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.