Recent

Sunday, August 8, 2021

Std-10 Sub-Marathi 1UT Examination

ENFANT INDIA ENGLISH   SCHOOL
             FIRST UNIT TEST

             STD 10th
             SUB  MARATHI
             MARKS-20


पुढील परिच्छेदाच्या आधारे केलेले सूचना नुसार कृती पूर्ण करा
कृती १
 प्रश्न १)  अ)आकृतीबंध पूर्ण करा 
२ गुण
लेखकाने  घेतलेली शालींची   काळजी  
                 व   उपयोग
१) ______ २_____ ३____ ४_____

कृती २    एका वाक्यात उत्तरे लिहा
                         २ गुण
१) लेखकाला कोठे बसायला आवडत असे?
२) थंडीच्या दिवसात लेखकाने काय पाहिले?

मी २००४ साली मराठी साहित्य- संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन एक-दोन वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या , की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक! त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले.
हळू हळू मी सगळ्या शाली वाटून
 टाकल्या, गरीब श्रमिकांना!
याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओकांरेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे.तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले, की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले.
दुसऱ्या दिवशी मी दोन चाली घेऊन ओमकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. या दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला
.
                व्याकरण
कृती १) समानार्थी शब्द लिहा. २ गुण
१) वृद्ध.         २) जवळचा 
३) बोचके      ४) भिकारी

 स्वमत २ गुण
  तुम्ही पाहिलेला एखादा कट्टा  या बद्दल लिहा.

              पद्य. विभाग 
 प्रश्न २ ) खालील पद्य  पंक्ती  वाचून
   दिलेल्या सूचनांनुसार कृती करा
कृती १ (आकलन)
१) आकृती पूर्ण करा १ गुण

योगाचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे
 १)पिलियासी    ‌‌________
 ‌२) जीवांसी  ‌   ________

जेवी चंद्रकिरणे  चकोरांसी |
पांखोवा  जेवी पिलियांसी ||
जीवन  जैसे का  जीवांसी ।
तेवी सर्वासी  मृदू्त्व 

जळ वरि वरी क्षाळी मळ |
 योगिया  सबाह्य करी निर्मळ|
उदक  सुखी करी एक वेळ |
योगी सर्व काळ सुख दाता | |

  उदकाचे  सुख ते किती |  
सवेचि क्षणे तृषिते  होती
योगिया  दे स्वानंद तृप्ती| 
सुखासी. विकृती पै नाही.||

कृती २ ) आकलन २ गुण
 योगी पुरुषाची चार  वैशिष्ट्ये 
i) ________________________
ii)________________________
iii)_______________________
iv) _______________________
 
कृती ३(काव्यसौंदर्य)२ गुण
१) योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 
 
प्रश्न ३          व्याकरण विभाग
                                  ७ गुण
i) ' पोटभर '  सारखे  चार शब्द  ' भर '  लावून तयार करा. २गुण
ii) खालील शब्दा पासून अर्थ पूर्ण शब्द बनवा.१ गुण
१ ) नेहमी  प्रमाणे
iii) समास ओळखा २गुण
  १) पंचमुखी
  २) पासनाापास
   ३)कपडालत्ता
    ४) संवादविसंवाद
iv) खालील वाक्यातील नाम  व  सर्वनामे ओळखा व लिहा.२ गुण
१) आम्हांला  मराठी वाचता येते
२) रमेश खूप काम करतो
३) त्यांनी मला पैसे दिले
४) जुलिया बरीच उंच होती.



 

        .