Recent

Thursday, April 1, 2021

Class:9 Sub-Marathi final examination

Enfant India English school
           द्वितीय सत्रांत परीक्षा
             विषय - मराठी
गुण ८०.                    वेळ ३ तास


            विभाग १ गद्य
प्रश्न१ अ) पुढील उताऱ्याच्या आधारे        दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. ७ गुण
मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औध ( जि. सातारा) येथील  हायस्कूल मध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती .म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो . त्यांचा सल्ला ,मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हणमंतराव देशमुख  हे गावचेच रहिवासी . त्यांनी मला इंग्रजी तरखडकराचे भाषांतर शिकवले . ते तसे स्काऊट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काऊट पथक पक्क्या पायावर उभे केलें होतें. श्री. कात्रे मास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले . अंकगणिता‌ सारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला
 आमचे कात्रे मास्तर.अंगाने सडपातळ , दम्याच्या विकाराने त्यांना कधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील  लाकडं फोडायला जायचे.
 श्री. गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पाहिलीत  तरखडकराचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री. गोळीवडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक. शाळेच्या बागा करण्यातच  त्यांचं अर्धं लक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा.परिचय झाला. त्याच कारण शाळेच्या ' बागा' आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयान  तसचं हाडा - पिंडाने मोठाड  कष्टाच्या कामाला कणखर . शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा  मुलांच्या जीवावर चांगली फुललेली ,उभी असे. या बागेतल्या विहीरीच पाणी दोन - दोन तास रहाटेनेओढून ,  बागेतल्या फुळझाडाना , फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती  फुलझाडं-  फलझाडं तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री. गोलीवडेकर  मास्टर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी, टिकावाने खांदावयाची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू.
१) आकृती बंध पूर्ण करा.२ गुण
                कात्रे मास्तर
                _________
               |               |
             अंगाने       कधी  कधी  त्रास 
                             
             [.    ].             [.    ]
२) कोण ते लिहा.२ गुण 
i) शेती तज्ञ शिक्षक.__________
ii) स्काऊट मास्तर ___________
३) स्वमत ३ गुण 
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व  विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. या विधाना बाबत तुमचे मत लिहा.
आ) पुढील  उताऱ्यच्या  आधारे  कृती करा.७ गुण
आ) १) आकृती  पुर्ण करा.२ गुण
लेखकाच्या शेजारी राहत असलेल्या  कुटुंबाच्या परसदारात
असणारी गोष्ट.______________
नसणारी गोष्ट.______________
____________________________
इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे, ती एक जोड इमारत होती. ट्वीन ब्लॉक . शेजारी जे राहत होते, त्यांच्या परसदारी  चक्क पाण्याचा हापसा होता म्हणजे भरपूर पाणी होते. मात्र अंगणात आणि परसदारात. गवताची काडी ही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली,त्रस्त वाटत त्या घरातली स्त्री नेहमी दागिने.घालून बसे ; परंतु पाणी  आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही .मला वाटतं झाड लावणं , ते जगवण, त्या व्दारे दूरवर आनंदाचे  आणि आश्वासनांचे संगीतमय.संदेश पसरवण आणि सर्व  सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी
लागते.जो माणूस एखाद झाड जगवतो,तो निसर्गात एक ' हिरवा चमत्कार रुजवत असतो . हे लिंबाचं झाडचं  बघा ना! ज्या  कुण्या बाईन हे झाड लावलं होत, ती बाई  इथून निघून गेली होती ; परंतु जाताना एक अदभुत नाट्य.ती आपल्या माग ठेवून गेली .  दर वर्षी, दर. ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार, फुलं येत असणारं  घमघमाट दरवळत असणारं आणि मग एक  अख्खा फलोत्सव ..... फळांचं  लगडणं ...‌....हे सगळं घडत असणार , मी तर केवळ एका ऋतुतला  सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तिवाचा साक्षीदार होतो; पण शेजारची ती माणसं? ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती ; परंतु न त्यांनी ते ' हिरवं कौतुक ' पाहिलं , न त्यांनी झाडं लावली , न त्यांनी फुलं फुलवली . हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलंच नाही . म्हणूनच कदाचित ती 
माणस त्यांच्या  परस - अंगणासारखीच  उदास ,भकास , तपकिरी अशीच वाटत राहिली. मनानं.
आ २) एका वाक्यात उत्तरे लिहा.
        i ) झाड जगवणारा  माणूस निसर्गात  काय रुजवत असतो? 
ii) झाड लावलेली बाई आपल्यामागे काय ठेऊन गेली होती? 
आ) २ ) स्वमत
 झाड जगवणे म्हणजे एक हिरवा चमत्कार रुजवणे असे जे म्हटले जाते  ते तुम्हास योग्य वाटत आहे का? तुमचे मत सांगा. 
प्रश्न १ इ‌) पुढील  अपठीत उतारा वाचा व त्यावर आधारित कृती सोडवा.४ गुण
कृती १) i ]झेंड्याचा पांढरा रंग गुणाचे 
           प्रतीक -  ________
         ii]  झेंड्याच्या हिरवा रंग गुणाचे प्रतीक. __________
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय ?  पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधे पणाचा  निर्देशक आहे  आणि त्यावरील अशोक चक्र काय सांगते. ते सद्गुणांची , धर्माची खूण सांगते . या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू. सत्यमय  राहू असा त्याचा अर्थ आहे . आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत . या चक्राचा आणखी काय अर्थ आहे ? चक्र म्हणजे गती .हे चक्र सांगते , की गतिमान रहा . केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे  आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भुमातेचा . या ध्वजाखाली उभे राहून सेवा वृत्तीने व निरहकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मुया.
‌.  २) पुढील अक्षरा पासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
i) गतिमान.     ii) हरितश्यामल
३) या कृतीने स्वर्ग निर्माण करायचा आहे.
i)_____________________
ii)____________________
      
           . विभाग २ पद्य विभाग
प्रश्न २ अ)खालील कविता.वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ)काय होते ते सांगा.१ गुण
१) ढग बरसतात तेव्हा.................
२)काटा पायात रूतल्यावर...............
वला  टाकती तिफन शितू वखर  पाहेते 
पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
डोया सपन पाहेते  काटा पायात रूतते
 काटा पायात रूतते लाल रगत सांडते
हिर्व सपन फुलते
हिर्व सपन फुलले ढग बरसले.
एका वाक्यात उत्तरे लिहा.२ गुण
i) भिजलेली ढेकळं‌ पायाला कशाप्रमाणे भासतात?
ii) शेतकरी  काळ्या ढेकळात काय
 पाहत‌आहे?
कृती २) जोड्या जुळवा   २ गुण
अ गट.         ‌.               ब गट
i) शितू.       ‌‌. ‌       अ पायात रुतते
ii) लोनी.              ब. हि्र्व सपन                             
iii) डोया.                  पाहेते
iv) काटा.             क. पायाला वाटते
 ‌.                         ड.  वखर पाहेते.

३)पर्यायी शब्द लिहा.१गुण
   i)जल          ii) रुधिर
४) काव्य  सौंदर्य.  २ गुण
'काटा पायात  रूतते लाल  रगत साडंते  हि्र्व सपन फुलते' .  या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न २ आ) पुढील कवितापैकी एका कविते संबंधी खालील मुद्यांचा आधारे कृती पूर्ण करा.           ८ गुण
i) उजाड उघडे माळरान ही
ii) पुन्हा एकदा
अ) कवितेचे कवी/ कवयित्री  १ गुण
ब) कवितेचा विषय.              १ गुण
क) कवितेतीलआवडलेलीओळ २ गुण
ड) कवितेतून मिळणारा संदेश   २ गुण 
इ) भाषिक  वैशिष्ट्ये               २ गुण
       ‌.  विभाग ‌३ स्थुलवाचन
खालील पैकी कोणत्याही तीन कृती सोडवा.                       ६ गुण
१) टीपा लिहा. ग्रँड  कॅनाल
२) विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात  आलेले फायदे लिहा.
३) व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे , पाठाच्या आधारे पटवून दया.
४) शब्द कोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते , या विषयी तुमचे मत लिहा.
                विभाग ४  भाषा अभ्यास
प्रश्न४  अ) व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा
१) वाक्याचे प्रकार ओळखा     २ गुण
    १) मुलांनो , तुम्ही फुलासारखे    फुलून  या.
२) केवढे जीवनदायी होत ते झाड!

२. वाक्य रूपांतर          .    २ गुण
i) बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. (आज्ञाअर्थी )
ii)अंधारात अभ्यास करू नका. ( विधान अर्थी)

३) खालील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(कोणतेही २)४ गुण
i) दरारा असणे   ii) हिरमुसले होणे
iii) समुपदेशन करणे.

आ) भाषासौंदर्य
i) विरुद्धार्थी शब्द लिहा.१ गुण
     i)शिळे ‌X
     ii) मृत्यु X

ii) समानार्थी शब्द लिहा.१ गुण
     i) हमी. 
    ii) निरोप-

iii) अचूक शब्द लिहा१ गुण
     i) आस्वासन, आश्वाशन, आश्वासन अश्वासन
ii)  लूकलुकत्या , लूकलूकत्या,लुकलुकत्या , लुकलकुत्या

iv) वचन बदला.         १ गुण
i) खिडकी.    ii) पक्षी

२) लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करून लिहा.                  २ गुण
i) चीमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमि गजबजलेल असे.
ii) पण थंड सा कुत्रिही तिथ विसाव्याला येत.
३) विराम चिन्हे
 पुढील वाक्यात योग्य विराम चिन्हाचा वापर करा.                   २ गुण
i) तू सहलीला येणार आहेस का
ii) आई म्हणाली चहा कर
                        
  विभाग ५  उपयोजित लेखन
प्रश्न ५ पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा.                               ५ गुण
           समर्थ ग्रंथ भांडार
           नेहरू रोड , सदाशिव पेठ , 
                       नागपूर
      ( सर्व  पुस्तकावर योग्य सवलत. )
        वेळ स. १०. ते रात्री ८. ०० 
                    सोमवार बंद
तुमच्या शाळेसाठी लागणाऱ्या पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा.
                    किंवा
तुमच्या शाळेसाठी लागणाऱ्या पुस्तकावर योग्य सवलत देण्यासाठी विनंती पत्र लिहा.
२) खालील मुद्दे वाचून एक कथा तयार करा.५ गुण
मुदे.कोळी _______ मासे मिळणे____
राजाला देण्यासाठी येणे______ पहारेकरी________ बक्षिसातील वाटा मागणे________ कोळ्याचा  चातुरपणा.
 ३) गद्य आकलन.           ५ गुण
खालील उतारा वाचून त्यावर पाच प्रश्न असे तयार करा की ज्याची उत्तरे एका वाक्यात येतील.

निसर्गातील प्रत्येक दृश्य.माणसाच्या मनाला आनंदित करणारे आहे. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अवर्णनीय शोभा दिसते. सूर्यबिंब लालभडक झालेले असते आणि मेघाच्या पटलावर संध्यारागाच्या अनंत छटा पसरलेल्या असतात किलबिलाट करीत घरट्याकडे पक्षी परतत असतात. सकाळी भिन्न भिन्न मार्गांनी उडालेले हे पक्षी संध्याकाळी मात्र  गटा गटाने घरट्याकडे येतात .रानावनात चरावयास गेलेली गुरे ढोरे सुद्धा  आतुरतेने घराकडे येतअसतात.गायीची आचळं वासराच्या ओढीनं तुडुंब भरलेलीअसतात.अधीर होऊन हंबरतच त्या गोठ्याकडे धावतात  तेव्हा त्यांच्या गळ्यातील तो घंटानाद कानाला तृप्त करतो. त्याच वेळी त्यांच्या पावलांनी उडालेली धूळ वातावरणातील लाल रंगात मिसळते .आणि वातावरणाला पवित्र करते . मंद मंद वाऱ्याच्या झुळका झाडे वेलीना हिंदळवतात. हळूहळू काळोखाची  मखमल  धरती  पा़घंरते आणि सारे विश्व विश्रांतीत  रममाण होते.
प्रश्न ५ ब.
१)बातमी लेखन.        ५ गुण
शाळेतवसुधंरा दिनानिमित्त वृक्ष दिंडी व वृक्षा रोपण कार्यक्रम वनाधिकारी 
मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.
२) जाहिरात लेखन       ५ गुण
प्रवासी बॅग , मजबूत सुंदर बॅग , ग्राहक समाधान.
प्रश्न ५ खालील लेखन प्रकरापैकी कोणतेही एक कृती सोडवा.  ५ गुण
i) परीक्षे पूर्वीचा एक तास
ii) मी झाड बोलतोय.